संस्थेचे प्रथम प्राचार्य स्वर्गीय श्री घोष सर पुण्यतिथी

सर्व सन्माननीय सदस्य
सप्रेम नमस्कार
आपल्या शासकीय तंत्रनिकेतन खामगाव या संस्थेचे प्रथम प्राचार्य स्वर्गीय श्री घोष सर यांचे पुण्यतिथीचा कार्यक्रम दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमासाठी आपल्या जीपीके माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी तसेच तंत्रनिकेतन मधील अधिकारी, प्राध्यापक हजर राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी माल्यार्पण व विनम्र श्रद्धांजली अर्पण करणे या कार्यक्रमाकरता हजर राहावे ही विनंती.