ध्येय व उद्दिष्ट
आपल्या माजी-विद्यार्थी संघटनेचे ध्येय व उद्दिष्ट हे संस्थेला व संस्थेतील गरजूंना मदत करणे आणि मोकळ्या मनाने गुणवत्तेला उत्तेजन देणे आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण समाजातून वेगाने कमी होत असलेल्या मानवी मूल्यांना प्रेरणादायी अभ्यासक्रम घेऊन रुजविण्यास हातभार लावू शकतो. बरेच विद्वान लोक आहेत ज्यांनी ही मूल्ये जनतेपर्यंत पोहचविण्याचा भार उचलला आहे. आम्ही या एनजीओ च्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन खामगांव या आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे ३-४ दिवसांचे लघु अभ्यासक्रम आयोजित करू शकतो.