शासकीय तंत्रनिकेतन खामगांव माजी-विद्यार्थी संघामार्फत झालेल्या सेवाभावी कामांची यादी

दिनांक २०/१२/२०१९ ते दिनांक १८/०१/२०२४ पर्यंत

अ. क्र.

कामाचे विवरण

रक्कम रुपये

1

कोविड-२०१९ करीता प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये प्रत्येकी रु. ११,०००/- या प्रमाणे देणगी दिली. 

२२,०००/-

2

संस्थेतील प्रथम वर्षात प्रवेशित पाचही विद्याशाखेतील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत म्हणून मोफत वाचनासाठी एकूण २८४ नग नवीन शैक्षणिक पुस्तके संस्थेला हस्तांतरीत केली. 

६५,४२६/-

3

संस्थेतील चवथ्या व सहाव्या सत्रात प्रवेशित पाचही विद्याशाखेतील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत म्हणून मोफत वाचनासाठी एकूण ६० नग नवीन शैक्षणिक पुस्तके संस्थेला हस्तांतरीत केली. 

९,३२८/-

4

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेच्या Public Health Engg. आणि Highway Engg. प्रयोगशाळां करिता उपकरणे व साहित्य विभागास हस्तांतरित केली. 

१२,११२/-

5

संस्थेतील प्रथम वर्षातील गरजू विद्यार्थ्यांसाठी १० नग drawing boards , १० नग Drawing Instrument Boxes, १०० नग Drawing Sheets, १० नग Engineering Mini Drafters, १० नग Set-Square Set, १०० नग Drawing Pencils, २ नग Blanekts, इत्यादी साहित्य व सामग्री हस्तांतरित केले. 

१०,०००/- (अंदाजित)

6

संस्थेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाण्यासाठी ८० लिटर साथ क्षमतेचे १ नग नवीन वॉटर कूलर (Make - Blue Star) वॉटर फिल्टरसह संस्थेतील रंगमंचाचे बाजूला बसविण्यात आले. [श्री. जनार्दन हिंमतराव भानुसे (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी), रा. - नागपूर यांनी परस्पर वहन केलेला खर्च]

५०,०००/- (अंदाजित)

7

संस्थेतील माजी-विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात कामकाज करण्यासाठी श्री. विजयकुमार लालूरामजी आश्रमा (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी) यांनी रु. २४,९९९/- किंमतीचे १ नग नवीन Desktop Computer Set परस्पर खरेदी करून संघटनेला सुपूर्द केले. 

२४,९९९/-

8

संस्था व वसतिगृहातील परिसर स्वच्छ राहण्यासाठी परिसरात एकूण ५ नग सिमेंट काँक्रीट कचरा कुंड्या (व्यास - ३ फूट, उंची - ३ फूट) बसविण्यात आले. [श्री. मदनमोहन जानकीलालजी जोशी (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी), रा. अमरावती यांनी वहन केलेला खर्च]

१४,५८०/-

9

शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२२-२३ मध्ये संस्थेतील सर्व विद्याशाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांमधून संस्था स्तरावर शाखानिहाय गुणानुक्रमे प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या एकूण पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. ५,०००/- या प्रमाणे धनादेश देऊन गौरविण्यात आले. 

१,००,०००/-

10

संस्था व वसतिगृहातील परिसरात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एकूण ३१ नग सिमेंट काँक्रीट बेंचेस बसविण्यात आले. 

९९,२००/-

11

संस्थेतील मुलींचे वसतिगृहातील विद्यार्थिनींना पिण्याचे शुद्ध व थंड पाण्यासाठी १०० लिटर साठा क्षमतेचे १ नग नवीन वॉटर कूलर (Make - Kingstar) वॉटर फिल्टरसह वसतिगृहात बसविण्यात आले. 

३३,६५०/-

12

संस्थेतील दिवंगत माजी प्राचार्य स्व. अरुण घोष सर व स्व. विष्णू खांडेकर सर यांची पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली कार्यक्रम सन २०२१ पासून नियमितपणे साजरा करण्यात येत आहे. 

किरकोळ खर्च

13

संस्थेत अभियंता दिवस व संविधान दिवस दोन्ही कार्यक्रम सन २०२१ पासून नियमितपणे साजरा करण्यात येत आहे. 

किरकोळ खर्च

14

संस्थेच्या परिसरात दिनांक १५/०८/२०२२ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यासाठी खड्डे खोदणे व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १५ ब्रास काळी माती टाकण्यात आली. 

३,०००/-

15

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विषम सत्रात प्रत्येक पहिल्या व तिसऱ्या शनिवारी संस्थेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी विपश्यना साधनेचे निःशुल्क आनापान शिबीर व नियमित अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

किरकोळ खर्च

16

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विषम सत्रात स्थापत्य अभि. आणि अणुविद्युत व संचार अभि. विद्याशाखेच्या तीनही वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी श्री. एजाज शेख (प्रकल्प संचालक - जीवन संजीवनी इन्स्टिट्युट, सांगली) यांची दोन दिवसीय (दिनांक ०६/१२/२०२२ ते ०७/१२/२०२२) निःशुल्क व्यक्तिमत्व व गुणवत्ता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

३,०००/-

17

संस्थेतील पाचही विद्याशाखेतील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील एकूण ११ गरजू विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी रु. ३,०००/- व दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी रु. २,५००/- याप्रमाणे श्री. मदनमोहन जानकीलालजी जोशी आर्थिक मदत योजने अंतर्गत रोख स्वरूपात रक्कम प्रदान करण्यात आली. 

६०,५००/-

18

संस्थेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाण्यासाठी १०० लिटर साठा क्षमतेचे १ नग नवीन वॉटर कूलर (Make - Aqua Simflo) वॉटर फिल्टरसह संस्थेतील ग्रंथालयाचे बाजूला बसविण्यात आले. 

३६,०००/-

19

संस्थेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाण्यासाठी कर्मशाळा विभाग, संगणक विभाग, अणुविद्युत विभाग व ग्रंथालय विभाग समोरील बाजूस बंद अवस्थेतील एकूण ४ नग वॉटर कूलर दुरुस्त करून व वॉटर फिल्टर बसविण्यात आले. 

१८,९३०/-

20

संस्थेतील परिसरात "GPK Alumni Supported PHOENIX GARDEN" उद्यान तयार करण्यासाठी अणुविद्युत अभि. विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत १० ब्रास नवीन पेव्हर ब्लॉक्स विकत आणले व संस्थेत उपलब्ध असलेले ७ ब्रास पेव्हर ब्लॉक्स याप्रमाणे एकूण १७ ब्रास पेव्हर ब्लॉक्स बसविण्यात आले. [श्री. राहुल मोहन पाटील (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी), रा. नांदुरा यांनी परस्पर वहन केलेला खर्च]

७०,०००/-

21

संस्थेच्या संपूर्ण परिसरातील झाडांना पाणी मिळण्यासाठी ठिंबक सिंचन प्रणाली करिता आवश्यक सर्व सामग्री जसे - Drip Feeder Line Pipe 16 mm Dia. Bundles of 400 m Length = 5 Nos., Straight Connectors = 2 Packets, Dripper Emmitters = 6 Packets, Dripper Line End = 1 Packet इत्यादी पुरविण्यात आले. [श्री. दीपक सेवकराम गावंडे (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी), रा. मु. पो. हाता, ता. बाळापूर, जि. अकोला यांनी परस्पर वहन केलेला खर्च]

२८,०००/-

22

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेच्या Public Health Engineering प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एकूण २५ नग Fibre Chairs without Handle पुरविण्यात आल्या. [श्री. राहुल प्रमोद पाटील (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी), रा. मु.पो. खामगांव, ता. खामगांव, जि. बुलढाणा यांनी परस्पर वहन केलेला खर्च]

१०,०००/-

23

संस्थेतील स्थापत्य अभि. विद्याशाखेच्या Computer Laboratory मध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यात अधिक मदत होण्यासाठी LCD Projector (Make - Viewsonic), Display Screen, Ceiling Mount Kit, HDMI Cable इत्यादी पुरविण्यात आले. [श्री. तुषार दिलीप सुचक (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी), रा. मु.पो. बुलढाणा, ता. व जि. बुलढाणा यांनी परस्पर वहन केलेला खर्च]

४३,०६४/-

24

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेच्या मध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एकूण ३० नग पुरविण्यात आल्या. [श्री. प्रवीण देवचंद पठ्ठे (स्थापत्य अभि. माजी-विद्यार्थी), रा. मु.पो. बुलढाणा, ता. व जि. बुलढाणा यांनी परस्पर वहन केलेला खर्च]

२३,३००/-

25

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेच्या सर्व Laboratories आणि Staff Rooms मधील दरवाजे व खिडक्यांना पडदे बसविण्यात आले. 

१४,९१५/-

26

संस्थेतील सर्व माजी-विद्यार्थी यांना संघटनेचे सभासद करून घेणे व सभासद शुल्क / देणगी रक्कम ऑनलाईन स्वरूपात स्वीकारणे तसेच सर्व माजी-विद्यार्थ्यांना संघटनेमार्फत झालेल्या कार्यांची व कार्यक्रमांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी स्वतंत्र व सर्वसमावेशक संकेतस्थळ www.gpkalumni.in तयार करण्यात आले.

२०,०००/-

शासकीय तंत्रनिकेतन खामगांव माजी-विद्यार्थी संघामार्फत जाहीर शिष्यवृत्ती व मदत योजनांचा तपशील

दिनांक २०/१२/२०१९ ते दिनांक १८/०१/२०२४ पर्यंत

अ. क्र.

शिष्यवृत्ती योजनेचे विवरण 

रक्कम रुपये

1

संस्थेतील पाचही विद्याशाखेतील अंतिम वर्षात (पाचव्या व सहाव्या सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मिळवून संबंधित विभागाच्या स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अंतिम वर्षाच्या विभाग-निहाय प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच गुणवंत विद्यार्थ्यांस दरवर्षी प्रत्येकी रु. ५,०००/- याप्रमाणे एकूण रु. २५,०००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [शासकीय तंत्रनिकेत खामगांव माजी-विद्यार्थी संघ शिष्यवृत्ती] - {देणगीदार - माजी-विद्यार्थी संघटना}

संघाच्या खात्यात जमा रकमेतून 

2

संस्थेतील पाचही विद्याशाखेतून अंतिम वर्षात (पाचव्या व सहाव्या सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मळवून संस्था स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अंतिम वर्षाच्या एका गुणवंत विद्यार्थ्यास दरवर्षी अंदाजित रु. १०,०००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [प्रथम प्राचार्य स्वर्गीय अरुणजी घोष सर शिष्यवृत्ती] - {देणगीदार - श्री. सतीश केवलराम विरमानी, देणगी रक्कम रु. १,१५,०००/-}

१,३९,७१९/- (मुदत ठेव)

3

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेतून प्रथम वर्षात (प्रथम व द्वितीय सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मिळवून संस्थेतील स्थापत्य अभि. विभागाच्या स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या व द्वितीय वर्षात संस्थेत प्रवेश घेणाऱ्या एका गुणवंत विद्यार्थ्यास दरवर्षी अंदाजित रु. १०,०००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [स्व. यशवंतजी मुंडीवाले शिष्यवृत्ती] = {देणगीदार - श्री. अविनाश यशवंतराव मुंडीवाले, देणगी रक्कम रु. १,२०,०००/-}

१,४२,९५९/- (मुदत ठेव)

4

संस्थेतील पाचही विद्याशाखेतून प्रथम वर्षातील Engineering Drawing या विषयाच्या सैद्धांतिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून संस्था स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या एका गुणवंत विद्यार्थ्यास दरवर्षी अंदाजित रु. ५,०००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [स्वर्गीय केशवरावजी दामोदारजी खांडेकर शिष्यवृत्ती] - {देणगीदार - श्री. रवींद्र केशवराव खांडेकर, देणगी रक्कम रु. ६०,०००/-}

६५,८४९/- (मुदत ठेव)

5

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेतून अंतिम वर्षात (पाचव्या व सहाव्या सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मिळवून संस्थेतील स्थापत्य अभि. विभागाच्या स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या एका गुणवंत मुलीला (Girl Student) दरवर्षी अंदाजित रु. ५,०००/- एवढ्य रकमेची शिष्यवृत्ती योजना. [मातोश्री नर्मदाबाई नामदेवराव निखाडे शिष्यवृत्ती] - {देणगीदार - श्री. सुभाष नामदेवराव निखाडे, देणगी रक्कम रु. ५१,०००/-}

१०,०००/- (अंदाजित)

6

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेतून प्रथम, द्वितीय, व अंतिम वर्षात (त्या-त्या वर्षातील दोन्ही सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मिळवून संस्थेतील स्थापत्य अभि. विभागाच्या स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक परकविणाऱ्या प्रत्येक वर्षातील तीनही गुणवंत विद्यार्थी येणे प्रमाणे एकूण नऊ गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु. ५,०००/- (प्रथम), रु. ४,०००/- (द्वितीय), व रु. ३,०००/- (तृतीय) याप्रमाणे एकूण रु. ३६,०००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [स्वर्गीय आकाश तायडे शिष्यवृत्ती] - {देणगीदार - श्री. सचिन निवृत्ती तायडे}

देणगीदार तर्फे रक्कम दरवर्षी संघाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. 

7

संस्थेतील कोणत्याही विद्याशाखेतून अंतिम वर्षात उत्तीर्ण झालेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि अतिशय व खरोखर गरजू आणि पुढील पदवी अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थ्यास दरवर्षी अंदाजित एकूण रु. ११,०००/- एवढ्या रकमेची पदवी शिक्षण-शुल्क मदत योजना, [स्वर्गीय पुरुषोत्तम नारायण कुलकर्णी मदत] - {देणगीदार - श्री. शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी}

देणगीदार तर्फे रक्कम दरवर्षी संघाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. 

8

संस्थेतील पाचही विद्याशाखेत कोणत्याही वर्षात सद्यस्थितीत संस्थेत शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि अतिशय व खरोखर गरजू अंदाजित एकूण १० विद्यार्थ्यांना दरवर्षी अंदाजित एकूण रु. ६०,०००/- एवढ्या रकमेची मदत योजना. (प्रत्येक विद्याशाखेतून अंदाजित एकूण २ विद्यार्थी येणे प्रमाणे. सदरील विभागनिहाय आकडेवारी मध्ये निकड नुसार बदल संभावित आहे.) [श्री. मदनमोहन जानकीलालजी जोशी मदत] - {देणगीदार - श्री. मदनमोहन जानकीलालजी जोशी}

देणगीदार तर्फे रक्कम दरवर्षी संघाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. 

9

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेतून अंतिम वर्षात (पाचव्या व सहाव्या सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मिळवून संस्थेतील स्थापत्य अभि. विभागाच्या स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या एका गुणवंत विद्यार्थ्यास दरवर्षी अंदाजित रु. २,५००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [स्वर्गीय वसंतराव रामचंद्र वैद्य शिष्यवृत्ती] - {देणगीदार - श्री. धनंजय वसंतराव वैद्य, देणगी रक्कम रु. २८,०००/-}

२८,०००/- (मुदत ठेव)

10

संस्थेतील पाचही विद्याशाखेतून अंतिम वर्षात (पाचव्या व सहाव्या सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मिळवून संस्था स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या अंतिम वर्षाच्या एका गुणवंत विद्यार्थ्यास दरवर्षी अंदाजित रक्कम रु. २,५००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [स्वर्गीय स्वरा रवींद्र वैद्य शिष्यवृत्ती] - {देणगीदार - श्री. धनंजय वसंतराव वैद्य, देणगी रक्कम रु. २८,०००/-}

२८,०००/- (मुदत ठेव)

11

संस्थेतील स्थापत्य अभि. या विद्याशाखेतून प्रथम वर्षात (प्रथम व द्वितीय सत्रात प्राप्त गुणांची सरासरी गृहीत धरून) सर्वाधिक गुण मिळवून संस्थेतील स्थापत्य अभि. विभागाच्या स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या एका गुणवंत मुलीला (Girl Student) दरवर्षी अंदाजित रु. ५,०००/- एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती योजना. [स्वर्गीय मनोरमाबाई सदाशिव पाचपोर शिष्यवृत्ती] - {देणगीदार - श्री. पद्माकर सदाशिव पाचपोर, देणगी रक्कम रु. ५१,०००/-}

५१,०००/- (मुदत ठेव)

12

संस्थेतील पाचही विद्याशाखेत कोणत्याही वर्षात सद्यस्थितीत शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आणि अतिशय व खरोखर गरजू (विभागीय स्तरावर शहानिशा करून) असलेल्या एकूण एका विद्यार्थ्यास दरवर्षी अंदाजित एकूण रु. ५,०००/- एवढ्या रकमेची मदत योजना. [श्री. विनयकुमार नामदेव गुंबळे मदत] - {देणगीदार - श्री. विनयकुमार नामदेव गुंबळे, देणगी रक्कम रु. ५०,०००/-}

५०,०००/- (मुदत ठेव)

13

संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार करिता तात्पुरती मदत (Emergency Temporary Medical Treatment Fund) योजना. 

१,००,०००/- (मुदत ठेव)

14

संघटनेचे दैनंदिन कामकाज व इतर खर्च भागविण्यासाठी (Corpus Fund) संघटनेद्वारा मुदत ठेव जमा. 

६,६५,०००/- (मुदत ठेव)

शासकीय तंत्रनिकेतन खामगांव माजी-विद्यार्थी संघाच्या नोंदणीकृत सभासदांची शाखा-निहाय आकडेवारी

दिनांक २०/१२/२०१९ ते दिनांक १८/०१/२०२४ पर्यंत

अ. क्र.

विद्याशाखा 

सभासदांची एकूण संख्या 

1

स्थापत्य अभियांत्रिकी 

५७४

2

यंत्र अभियांत्रिकी 

३७५

3

विद्युत अभियांत्रिकी 

२५०

4

अणुविद्युत व संचार अभियांत्रिकी 

२१५

5

संगणक अभियांत्रिकी 

२०५

एकूण बेरीज 

१६१९

वर्गीकृत सभासद निहाय आकडेवारी

(संस्थापक / आजीव / साधारण)

संस्थापक सभासद = ३२

आजीव सभासद = १५८७

साधारण सभासद = निरंक