आमसभेची सूचना

मा. सभासद
आपल्या संस्थेची वार्षिक आमसभा दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थेच्या परिसरात घेण्यात येईल. तरी कृपया वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.

दि. २५/१२/२०२२
स्थळ – खामगांव

सचिव

आमसभेपुढील विषय
१. मागील आमसभेच्या इतिवृत्त वाचून कायम करणे
२. मागील आमसभेपासून आतापर्यंत कार्यकारिणीने केलेल्या कार्यवाहीस मंजुरी देणे
३. मागील आमसभेपासून आतापर्यंतच्या जमा खर्चास मंजुरी देणे
४. संस्थेच्या अंकपरीक्षणास मंजुरी देणे
५. संस्थेच्या वर्ष २०२३-२४ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे
६. संस्थेच्या उत्कर्षासाठी सूचना व आराखड्याबाबत सभासदांचे मनोगत/सूचना
७. संस्थेच्या सुचारुपूर्ण कार्यवाही साठी स्थानिक मंडळे (local chapter) तयार करून त्यांची कार्यदिशा व कार्यकारी मंडळ ठरविणे
८. विद्यार्थ्यांचे उत्कर्षासाठी योजना आखणे
९. ऑनलाईन व ऑफलाईन लेक्चर, ट्रेनिंग ठरविणे
१०. संस्थेसाठी निधी गोळा करणे बाबत सूचना/प्रस्ताव
११. संस्थेच्या सभासदांसाठी संपर्क यंत्रणा तयार करणे
१२. मा. अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणारे विषय
१३. आभार प्रदर्शन

आवश्यक सूचना
१. आमसभा दिनांक ०४/०२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरु होईल. कोरम अभावी सभा स्थगित करावी लागली तर ११.३० वाजता परत सभा बोलाविण्यात येईल. त्यास कोरमची आवश्यकता राहणार नाही.
२. आमसभेसाठी रु ४००/- भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी ९.३० वाजेपासून सुरु होईल. वर्ष २०२१ व २०२२ मधील माजी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क रु २००/- राहील.
३. संस्थेच्या सभासदास संस्थेबाबत काही प्रश्न/खुलासा विचारावयाचा असल्यास तसे ०१/०२/२०२३ पर्यंत सचिवांकडे लेखी स्वरूपात द्यावे. वेळेवर विचारलेल्या प्रश्नावर खुलासा देणे शक्य होणार नाही.
४. सभेनंतर सहभोजनासाठी सर्व सभासदांना आमंत्रित करण्यात येत आहे.

स्नेहमिलन सूचना

मा. सभासद
आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे कुटुंबासह स्नेहमिलन ०३/०२/२०२३, शुक्रवारी शेगांवी घेण्याबाबत या अगोदर सूचित केलेले आहे. कृपया आपल्या उपस्थिती बाबत १५/०१/२०२३ पर्यंत संस्थेला कळविण्यात यावे.

१. स्नेहमिलन व आमसभा नोंदणीसाठी प्रति व्यक्ती रु १०००/- (एक हजार फक्त) द्यायचे आहेत.
२. स्नेहमिलनासाठी शेगांव संस्थान मध्ये राहण्याची व्यवस्था स्वतः करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक मदत संस्थेमार्फत करण्यात येईल.
३. स्नेहमिलनाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे :
(i) सकाळी ९.०० वाजता संस्थानच्या भक्तनिवास क्र. ५ जवळ सर्वांनी यावे.
(ii) दर्शन व महाप्रसाद संस्थानमध्ये घेण्यात येईल.
(iii) स्नेहमिलन दुपारी २.०० वाजेपासून नियोजित जागेवर सुरु होईल. त्यामध्ये ओळख, चर्चा, भाषणे, करमणुकीचे कार्यक्रम (सभासदांकडून) होतील.
(iv) चहापान व सहभोजन

ज्या सभासद कुटुंबांना आमसभेसाठी खामगांवी यावयाचे आहे त्यांनी आनंद विहार समोर सकाळी ७.३० वाजता उपस्थित राहावे. त्यांचा नाश्ता व जेवण खामगांवी आहे. कुटुंबाचे गप्पा व चर्चेसाठी संस्थेच्या कार्यालयात व्यवस्था केलेली आहे.

कृपया जास्तीत जास्त सभासदांनी या स्नेहमिलनासाठी उपस्थित राहावे ही विनंती. 

सचिव