स्नेहमिलन सूचना

शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२५
विश्वेश्वरय्या हॉल शासकीय तंत्रनिकेतन परिसर खामगाव

मा. सभासद व सर्व परिवार सदस्य
नमस्कार ,
आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे कुटुंबासह स्नेहमिलन १४-०२-२०२५ शुक्रवार रोज़ी दुपारी ४-०० ते ७-३० या वेळेमध्ये खामगाव येथे घेण्याचे निश्चित केले आहे. कृपया आपल्या उपस्थिती बाबत श्री रामकृष्ण जवकार कोषाध्यक्ष जिपीके माजी विद्यार्थी संघ यांच्याकडे दिनांक ०१-०२-२०२५ पर्यंत आपली नावे WhatsApp द्वारे 9422283435 या क्रमांकावर कळविण्यात यावी ही विनंती.

  1. स्नेहमिलन नोंदणीसाठी प्रति व्यक्ती रु. ३००/- ( तिनशे फक्त) द्यायचे आहेत. तसेच रु. ४००/- प्रति कुटुंब सदस्य प्रमाणे द्यायचे आहेत.
  2. स्नेहमिलनासाठी आलेल्या सदस्यांनी राहण्याची व्यवस्था स्वतः करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक ती मदत GPK संघामार्फ़त करण्यात येईल.
  3. स्नेहमिलनाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे
    • स्नेहमिलन कार्यक्रम दुपारी ४-०० वाजेपासून विश्वेश्वरया हॉल शासकीय तंत्रनिकेतन परिसर खामगाव येथे होईल.
    • त्यामध्ये ओळख, चर्चा, भाषणे व करमणुकीचे कार्यक्रम (सभासदांकडून) होतील.
    • संध्याकाळी ५-०० वाजता चहापान व नंतर ७-०० वाजता सहभोजन (पावभाजी व स्विट)

दिनांक १४ फेब्रुवारी२०२५ शुक्रवार रोजी सर्व सभासदाना व सर्व कुटुंबीयाना खामगांव येथे नाश्ता सकाळी ९-०० ते १०-०० व जेवण दुपारी १-३० ते २-३० आहे.

सर्व कुटुंबीयांची सकाळी नाश्त्यानंतर श्री जगदंबा माता घाटपुरी येथे दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल.

त्यांचे दुपारचे भोजन GPK परिसरात सर्वा सोबत आहे.

कृपया जास्तीत जास्त सभासदांनी स्नेहमिलनाचे कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती.

पेमेंट शेड्युल खालील प्रमाणे

  1. फक्त एजीएम सदस्यांकरिता रूपये 500/-
  2. एजीएम अधिक गेटटुगेदर सदस्यांकरिता रुपये 800/-
  3. फॅमिली करिता गेट-टुगेदर रुपये 400/-
  4. सदस्य व फॅमिली करिता रुपये 1200/-

तरी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे दृष्टीने आपली संमती त्वरित कळवावी विनंती.

संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव
माजी विद्यार्थी संघ

आमसभेची सूचना

मा. सभासद
आपल्या संस्थेची वार्षिक आमसभा दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थेच्या परिसरात घेण्यात येईल. तरी कृपया वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.

स्थळ – शासकीय तंत्रनिकेतन परिसर, खामगाव

आमसभेपुढील विषय

  1. मागील दिनांक 20 मार्च 2024 रोजीच्या आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
  2. मागील आमसभेपासून आतापर्यंत कार्यकारिणीने केलेल्या कार्यवाहीस मंजुरी देणे.
  3. मागील आमसभेपासून आतापर्यंतच्या जमा खर्चास मंजुरी देणे.
  4. संस्थेच्या वर्ष २०२४-२०२५ च्या अंकपरीक्षणास मंजुरी देणे.
  5. संस्थेच्या वर्ष २०२५-२६ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
  6. संस्थेच्या उत्कर्षासाठी व विद्यार्थ्यांच्या उपयोगी असणाऱ्या सूचना व आराखड्याबाबत सभासदांचे मनोगत/सूचना.
  7. संस्थेच्या सुचारुपूर्ण कार्यवाही साठी स्थानिक मंडळे (local chapter) तयार करून त्यांची कार्यदिशा व कार्यकारी मंडळ ठरविणे.
  8. विद्यार्थ्यांचे उत्कर्षासाठी योजना आखणे.
  9. ऑनलाईन व ऑफलाईन लेक्चर, ट्रेनिंग ठरविणे.
  10. संस्थेसाठी निधी गोळा करणे बाबत सूचना/प्रस्ताव.
  11. संस्थेच्या सभासदांसाठी संपर्क यंत्रणा तयार करणे.
  12. मा.अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणारे विषय.
  13. आभार प्रदर्शन

संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव माजी विद्यार्थी संघ

आवश्यक सूचना

  1. आमसभा दिनांक १४-०२-२०२५ रोजी सकाळी १०-०० वाजता सुरु होईल. कोरम अभावी सभा स्थगित करावी लागली तर १०-३० वाजता परत सभा बोलाविण्यात येईल. त्यास कोरमची आवश्यकता राहणार नाही.
  2. आमसभेसाठी रु ५००/- भरून नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी ९- ०० वाजेपासून सुरु होईल. वर्ष २०२१, २०२२, २०२३, व २०२४ मधील माजी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क फक्त रु. २००/- राहील.
  3. संस्थेच्या सभासदास संस्थेबाबत काही प्रश्न/खुलासा विचारावयाचा असल्यास तसे ०१-०२-२०२५ पर्यंत सचिवांकडे लेखी स्वरूपात द्यावे. वेळेवर विचारलेल्या प्रश्नावर खुलासा देणे शक्य होणार नाही.
  4. सभेनंतर सहभोजनासाठी सर्व सभासदांना व कुटंबियाना सादर आमंत्रित करण्यात येत आहे.

संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव माजी विद्यार्ती संघ
दिनांक १४-०१ -२०२५