नम्र आवाहन

सर्व सन्माननीय सदस्य,
सस्नेह नमस्कार!

आपणास नम्रपणे कळवू इच्छितो की, मी दिवाळी पूर्वी बऱ्याच सन्माननीय सदस्यांना आपल्या जीपीके माजी विद्यार्थी संघासाठी देणगी देण्याबाबत फोन केले होते. आनंदाची गोष्ट अशी की सर्व सन्माननीय सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.

आता आपणास विनंती करण्यात येते की कृपया आपण ऐच्छिक आपल्या इच्छेनुसार जी देणगी देण्याची इच्छा असेल ती द्यावी ही विनंती.

महत्वाचे म्हणजे देणगीसाठी आम्ही सर्व सन्माननीय सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, जर आम्ही आपणास फोन करू शकलो नाही तरी कृपया आपण आपल्या इच्छेनुसार देणगी द्यावी व आपल्या जिपीके माजी विद्यार्थी संघाचे सामाजिक कार्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.

टिप- सदरचा मेसेज हा शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाही.

सचिव
जीपीके माजी विद्यार्थी संघ
खामगाव

मिशन – “एक हात मदतीचा”

सर्व सन्माननीय सदस्य,
सस्नेह नमस्कार!

आपल्या जीपीके माजी विद्यार्थी संघाने हुशार, होतकरू, व गरजू विद्यार्थ्यांकरीता एक हात मदतीचा मिशन सुरू केलेले आहे. आपण सद्या 15 ते 20 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत असतो. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

आपणास कमीत कमी 50 ते 60 विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता यावी याकरिता हे मिशन सुरू केलेले आहे.
आपल्यापैकी काही सन्माननीय सदस्यांनी रुपये 55000/- संघटनेमार्फत एफडी ठेवल्यास त्याचे व्याज रुपये 5000/- दरवर्षी एका विद्यार्थ्यास मदत देणे शक्य होईल. आपण वरील रक्कम 2/3 हप्त्यामध्ये देऊ शकता. आपणास संघातर्फे आवाहन करण्यात येते की, वरील मिशनमध्ये आपल्यापैकी जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.?

टीप- हा मेसेज सध्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी नाही याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.

सचिव
जीपीके माजी विद्यार्थी संघ
खामगाव

नम्र आवाहन

सर्व सन्माननीय सदस्य,
सस्नेह नमस्कार!

आपल्या शासकीय तंत्रनिकेतन खामगाव या संस्थेमधील सन 1965 ते 2025 या दरम्यान उत्तीर्ण झालेले बरेचसे विद्यार्थी आपल्या माजी विद्यार्थी संघाचे सन्माननीय सदस्य आहेत.

आज रोजी सन 1965 ते 2020 या कालावधीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुपर क्लास वन, क्लास वन, क्लास टू अशा मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत. त्यापैकी काही सन्माननीय सदस्य सेवानिवृत्त झालेले आहेत.

काही सन्माननीय सदस्य मोठ-मोठे कारखानदार, उद्योगपती व बिल्डर तसेच क्लास वन, क्लास टू कॉन्ट्रॅक्टर आहेत. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

आज रोजी माजी विद्यार्थी संघ, शासकीय तंत्रनिकेतन खामगाव मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वांगीन विकास होण्याचे दृष्टीने कार्य करीत आहे. माजी विद्यार्थी संघाचे कार्य हे पूर्णतः देणग्यावर अवलंबून आहे. आपल्यापैकी बऱ्याच सन्माननीय सदस्यांनी रुपये 5000/- ते रुपये 1,11,000/-पर्यंत देणग्या दिलेल्या आहेत. सद्यस्थितीत आपण सर्वजण समाजामध्ये सक्षमपणे कार्य करीत आहात याचा माजी विद्यार्थी संघाला सार्थ अभिमान आहे.

आपणास विनंती करण्यात येते की, आपण कमीत कमी ऐच्छिक रुपये 5000/- किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त खालील प्रमाणे योगदान द्यावे ही विनंती.

  1. उद्योगपती, कारखानदार, बिल्डर, क्लास वन कॉन्ट्रॅक्टर व क्लास टू कॉन्ट्रॅक्टर यांनी सीएसआर फंडातून रक्कम देण्यात यावी – रुपये एक लक्ष
  2. क्लास वन क्लास टू अधिकारी प्रोफेसर आयटी इंजिनियर यांनी रुपये पन्नास हजार
  3. सेवानिवृत्त अधिकारी प्रोफेसर व इतर खात्यातील अभियंता यांनी रुपये पंचवीस हजार

सर्व सन्माननीय सदस्यांना आग्रहाची विनंती करण्यात येते की वरील प्रमाणे एकदाच देणगी देऊन सहकार्य केल्यास आपल्या संघटनेतर्फे हाती घेतलेली कार्ये चांगल्या प्रकारे कायमस्वरूपी चालू शकतील तरी सर्व सन्माननीय सदस्यांनी सहकार्य करावे ही विनंती. ?

टीप- वरील मेसेज हा सध्या पदवी शिक्षण घेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठी नाही.

सचिव
जीपीके माजी विद्यार्थी संघ
खामगाव