मा. सभासद
आपल्या संस्थेची वार्षिक आमसभा मा. अध्यक्षांचे अध्यक्षतेखाली दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोज शुक्रवार सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या परिसरात घेण्यात येईल. तरी कृपया वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.
स्थळ – शासकीय तंत्रनिकेतन खामगाव परिसर
आमसभेपुढील विषय
- शासकीय तंत्रनिकेतन खामगाव मधील गॅदरिंगचे कार्यक्रमात टॉपर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल
- मागील आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- मागील आमसभेपासून आतापर्यंत कार्यकारिणीने केलेल्या कार्यवाहीस मंजुरी देणे
- मागील आमसभेपासून आतापर्यंतच्या जमा खर्चास मंजुरी देणे
- संस्थेच्या अंकपरीक्षणास मंजुरी देणे वर्ष २०२४-२५
- संस्थेच्या वर्ष २०२५-२६ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे
- संस्थेच्या उत्कर्षासाठी सूचना व आराखड्याबाबत सभासदांचे मनोगत/सूचना
- संस्थेच्या सुचारुपूर्ण कार्यवाही साठी स्थानिक मंडळे (local chapter) तयार करून त्यांची कार्यदिशा व कार्यकारी मंडळ ठरविणे
- विद्यार्थ्यांचे उत्कर्षासाठी योजना आखणे
- ऑनलाईन व ऑफलाईन लेक्चर, ट्रेनिंग ठरविणे
- संस्थेसाठी निधी गोळा करणे बाबत सूचना/प्रस्ताव
- संस्थेच्या सभासदांसाठी संपर्क यंत्रणा तयार करणे
- मा. अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणारे विषय
- आभार प्रदर्शन
आवश्यक सूचना
- आमसभा दिनांक १३-०२-२०२६ रोज शुक्रवार सकाळी १०.३० वाजता सुरु होईल. कोरम अभावी सभा स्थगित करावी लागली तर ११.०० वाजता परत सभा बोलाविण्यात येईल. त्यास कोरमची आवश्यकता राहणार नाही.
- आमसभेसाठी रु ५००/- भरून नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी ९.३० वाजेपासून सुरु होईल. वर्ष २०२३, २०२४ व २०२५ मधील माजी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क रु २००/- राहील.
- संस्थेच्या सभासदास संस्थेबाबत काही प्रश्न/खुलासा विचारावयाचा असल्यास तसे ५-०२-२०२६ रोज गुरुवार पर्यंत सचिवांकडे लेखी स्वरूपात द्यावे. वेळेवर विचारलेल्या प्रश्नावर खुलासा देणे शक्य होणार नाही.
- सभेनंतर सहभोजनासाठी सर्व सभासदांना व कुटंबियाना सादर आमंत्रित करण्यात येत आहे.
संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव
माजी विद्यार्ती संघ
दिनांक २०-०१ -२०२६
