WhatsApp Image 2024-01-19 at 2.05.33 PM

शासकीय तंत्रनिकेतन खामगाव या संस्थेचे माजी प्राचार्य स्वर्गीय श्री विष्णू विश्वनाथ खांडेकर यांचे सातवे पुण्यस्मरण

दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11-00 वाजता जीपीके माजी विद्यार्थी संघटनेचे सर विश्वेश्वरया हॉलमध्ये आपल्या शासकीय तंत्रनिकेतन खामगाव या संस्थेचे माजी प्राचार्य स्वर्गीय श्री विष्णू विश्वनाथ खांडेकर सर यांचे सातव्या पुण्यतिथीनिमित त्यांचे फोटोस हार अर्पण करून व विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जीपीके संस्थेचे विद्युत विभाग प्रमुख श्री मुंदडा सर, श्री मैंड सर, श्री प्रकाश मोदे सर, श्री प्रभाकर भेलके सर, श्री अशोक मानकर सर, श्री प्रमोद सातव सर, श्री सोनी सर तसेच आपल्या जीपीके संस्थेचे माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. श्री अशोक मानकर,श्री प्रकाश मोदे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुंदडा सर यांनी मनोगत व्यक्त केले.

सुत्रसंचलन श्री रामकृष्ण जवकार यांनी केले. शेवटी श्री सचिन सोनी सर यांनी आभार मानले. त्यानंतर कार्यक्रम संपला असे जाहीर करण्यात आले.

Tags: No tags

Comments are closed.