मा. सभासद
आपल्या संस्थेची वार्षिक आमसभा दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थेच्या परिसरात घेण्यात येईल. तरी कृपया वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.
स्थळ – शासकीय तंत्रनिकेतन परिसर, खामगाव
आमसभेपुढील विषय
- मागील दिनांक 20 मार्च 2024 रोजीच्या आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- मागील आमसभेपासून आतापर्यंत कार्यकारिणीने केलेल्या कार्यवाहीस मंजुरी देणे.
- मागील आमसभेपासून आतापर्यंतच्या जमा खर्चास मंजुरी देणे.
- संस्थेच्या वर्ष २०२४-२०२५ च्या अंकपरीक्षणास मंजुरी देणे.
- संस्थेच्या वर्ष २०२५-२६ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.
- संस्थेच्या उत्कर्षासाठी व विद्यार्थ्यांच्या उपयोगी असणाऱ्या सूचना व आराखड्याबाबत सभासदांचे मनोगत/सूचना.
- संस्थेच्या सुचारुपूर्ण कार्यवाही साठी स्थानिक मंडळे (local chapter) तयार करून त्यांची कार्यदिशा व कार्यकारी मंडळ ठरविणे.
- विद्यार्थ्यांचे उत्कर्षासाठी योजना आखणे.
- ऑनलाईन व ऑफलाईन लेक्चर, ट्रेनिंग ठरविणे.
- संस्थेसाठी निधी गोळा करणे बाबत सूचना/प्रस्ताव.
- संस्थेच्या सभासदांसाठी संपर्क यंत्रणा तयार करणे.
- मा.अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणारे विषय.
- आभार प्रदर्शन
संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव माजी विद्यार्थी संघ
आवश्यक सूचना
- आमसभा दिनांक १४-०२-२०२५ रोजी सकाळी १०-०० वाजता सुरु होईल. कोरम अभावी सभा स्थगित करावी लागली तर १०-३० वाजता परत सभा बोलाविण्यात येईल. त्यास कोरमची आवश्यकता राहणार नाही.
- आमसभेसाठी रु ५००/- भरून नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी ९- ०० वाजेपासून सुरु होईल. वर्ष २०२१, २०२२, २०२३, व २०२४ मधील माजी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क फक्त रु. २००/- राहील.
- संस्थेच्या सभासदास संस्थेबाबत काही प्रश्न/खुलासा विचारावयाचा असल्यास तसे ०१-०२-२०२५ पर्यंत सचिवांकडे लेखी स्वरूपात द्यावे. वेळेवर विचारलेल्या प्रश्नावर खुलासा देणे शक्य होणार नाही.
- सभेनंतर सहभोजनासाठी सर्व सभासदांना व कुटंबियाना सादर आमंत्रित करण्यात येत आहे.
संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव माजी विद्यार्ती संघ
दिनांक १४-०१ -२०२५