शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी २०२५
विश्वेश्वरय्या हॉल शासकीय तंत्रनिकेतन परिसर खामगाव
मा. सभासद व सर्व परिवार सदस्य
नमस्कार ,
आपल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचे कुटुंबासह स्नेहमिलन १४-०२-२०२५ शुक्रवार रोज़ी दुपारी ४-०० ते ७-३० या वेळेमध्ये खामगाव येथे घेण्याचे निश्चित केले आहे. कृपया आपल्या उपस्थिती बाबत श्री रामकृष्ण जवकार कोषाध्यक्ष जिपीके माजी विद्यार्थी संघ यांच्याकडे दिनांक ०१-०२-२०२५ पर्यंत आपली नावे WhatsApp द्वारे 9422283435 या क्रमांकावर कळविण्यात यावी ही विनंती.
- स्नेहमिलन नोंदणीसाठी प्रति व्यक्ती रु. ३००/- ( तिनशे फक्त) द्यायचे आहेत. तसेच रु. ४००/- प्रति कुटुंब सदस्य प्रमाणे द्यायचे आहेत.
- स्नेहमिलनासाठी आलेल्या सदस्यांनी राहण्याची व्यवस्था स्वतः करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक ती मदत GPK संघामार्फ़त करण्यात येईल.
- स्नेहमिलनाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे
- स्नेहमिलन कार्यक्रम दुपारी ४-०० वाजेपासून विश्वेश्वरया हॉल शासकीय तंत्रनिकेतन परिसर खामगाव येथे होईल.
- त्यामध्ये ओळख, चर्चा, भाषणे व करमणुकीचे कार्यक्रम (सभासदांकडून) होतील.
- संध्याकाळी ५-०० वाजता चहापान व नंतर ७-०० वाजता सहभोजन (पावभाजी व स्विट)
दिनांक १४ फेब्रुवारी२०२५ शुक्रवार रोजी सर्व सभासदाना व सर्व कुटुंबीयाना खामगांव येथे नाश्ता सकाळी ९-०० ते १०-०० व जेवण दुपारी १-३० ते २-३० आहे.
सर्व कुटुंबीयांची सकाळी नाश्त्यानंतर श्री जगदंबा माता घाटपुरी येथे दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल.
त्यांचे दुपारचे भोजन GPK परिसरात सर्वा सोबत आहे.
कृपया जास्तीत जास्त सभासदांनी स्नेहमिलनाचे कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती.
पेमेंट शेड्युल खालील प्रमाणे
- फक्त एजीएम सदस्यांकरिता रूपये 500/-
- एजीएम अधिक गेटटुगेदर सदस्यांकरिता रुपये 800/-
- फॅमिली करिता गेट-टुगेदर रुपये 400/-
- सदस्य व फॅमिली करिता रुपये 1200/-
तरी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे दृष्टीने आपली संमती त्वरित कळवावी विनंती.
संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव
माजी विद्यार्थी संघ