आमसभेची सूचना – शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी २०२६

मा. सभासद
आपल्या संस्थेची वार्षिक आमसभा मा. अध्यक्षांचे अध्यक्षतेखाली दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोज शुक्रवार सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या परिसरात घेण्यात येईल. तरी कृपया वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती.

स्थळ – शासकीय तंत्रनिकेतन खामगाव परिसर

आमसभेपुढील विषय

  1. शासकीय तंत्रनिकेतन खामगाव मधील गॅदरिंगचे कार्यक्रमात टॉपर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येईल
  2. मागील आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
  3. मागील आमसभेपासून आतापर्यंत कार्यकारिणीने केलेल्या कार्यवाहीस मंजुरी देणे
  4. मागील आमसभेपासून आतापर्यंतच्या जमा खर्चास मंजुरी देणे
  5. संस्थेच्या अंकपरीक्षणास मंजुरी देणे वर्ष २०२४-२५
  6. संस्थेच्या वर्ष २०२५-२६ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे
  7. संस्थेच्या उत्कर्षासाठी सूचना व आराखड्याबाबत सभासदांचे मनोगत/सूचना
  8. संस्थेच्या सुचारुपूर्ण कार्यवाही साठी स्थानिक मंडळे (local chapter) तयार करून त्यांची कार्यदिशा व कार्यकारी मंडळ ठरविणे
  9. विद्यार्थ्यांचे उत्कर्षासाठी योजना आखणे
  10. ऑनलाईन व ऑफलाईन लेक्चर, ट्रेनिंग ठरविणे
  11. संस्थेसाठी निधी गोळा करणे बाबत सूचना/प्रस्ताव
  12. संस्थेच्या सभासदांसाठी संपर्क यंत्रणा तयार करणे
  13. मा. अध्यक्षांचे परवानगीने वेळेवर येणारे विषय
  14. आभार प्रदर्शन

आवश्यक सूचना

  1. आमसभा दिनांक १३-०२-२०२६ रोज शुक्रवार सकाळी १०.३० वाजता सुरु होईल. कोरम अभावी सभा स्थगित करावी लागली तर ११.०० वाजता परत सभा बोलाविण्यात येईल. त्यास कोरमची आवश्यकता राहणार नाही.
  2. आमसभेसाठी रु ५००/- भरून नोंद करणे आवश्यक आहे. नोंदणी ९.३० वाजेपासून सुरु होईल. वर्ष २०२३, २०२४ व २०२५ मधील माजी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क रु २००/- राहील.
  3. संस्थेच्या सभासदास संस्थेबाबत काही प्रश्न/खुलासा विचारावयाचा असल्यास तसे ५-०२-२०२६ रोज गुरुवार पर्यंत सचिवांकडे लेखी स्वरूपात द्यावे. वेळेवर विचारलेल्या प्रश्नावर खुलासा देणे शक्य होणार नाही.
  4. सभेनंतर सहभोजनासाठी सर्व सभासदांना व कुटंबियाना सादर आमंत्रित करण्यात येत आहे.

संजय कुलकर्णी
सचिव
शासकीय तंत्रनिकेतन खामगाव
माजी विद्यार्ती संघ
दिनांक २०-०१ -२०२६

Tags: No tags

Comments are closed.